“मुले म्हणजे देवाघरची फुले” असे पूज्य साने गुरुजी म्हणत असत.फुलांची जोपासना चांगल्याप्रकारे केल्यास ती चांगला व सुंदर उमलतात .मोठमोठ्या नेत्यांना हातात संपत्ती – सत्ता असतांना सुद्धा “रम्य ते बालपण” असे वाटत असते. म्हणूनच पं .जवाहरलाल नेहरू , महात्मा गांधी यांसारखे थोर नेते देखील क्षणभर का होईना बालकांमध्ये मिसळून आपले बालपण परत अनुभवण्याचा प्रयत्त्न करित असत. |