प्रथितशय कवि , सुरेश भट यांच्या कवितांचे वाचक , श्रोते , चाहते महाराष्ट्रातचे नव्हे तर बृहन्मराष्ट्रातही अनेक ठिकाणी आहेत . त्यांच्या मराठीतील गझलेने तर अनेक वाचकश्रोत्यांना मोहित करून जणू गझल वेडे केले आहे. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ (मूळ गायिकादेवकी पंडित ) असो किंवा माझिया मृत्यूत व्हावी (मूळ गायक सुरेश वाडकर ).....आशा संगीतबद्ध रचनांची संगीत रसिकांवरील मोहिनी अफाट आणि अमीट आहे |