१९ व्या शतकात भारतात सुरु झालेल्या प्रभोधनाच्या चळवळीने स्त्रियांच्या पारंपारिक स्थितीत परिवर्तन घडवून आणण्यास चालना दिली. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्यांचा स्थान आणि भूमिकेत बदल घडवून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्त्री विकासाला चालना मिळाली . स्त्रियांना शिकण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळे थोड्याच काळात स्त्रियांनी गगनभरारी घेतली आणि आपली क्षमता सिद्ध केली . आज अनेक स्त्रिया वेगवेगळ्या पदावर काम करत असल्या तरी त्यांच्यावरील पिळवणूक , अत्याचार आणि जुलूम यात घात झाली आहे म्हणता येत नाही . वास्तविक पाहता इंग्रज राजवटीत निर्माण झालेल्या सामाजिक सुधारणांमुळे स्त्री आपल्या पारंपारिक क्षेत्रातून बाहेर आली. |