महाराष्ट्र राज्य प्रगतीशील असून कृषी क्षेत्रावर राज्यातील ५५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे . स्थूल उत्पन्नात १२.४२ टक्के हिस्सा असून कृषी विकासाचे प्रतिबिंब इतर क्षेत्रावर दिसून येते . आर्थिक विकास व लोकसंख्या वाढीबरोबर शेत जमिनीचे वाटप अतिशय विषम असून अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे . कृषी क्षेत्रात संस्थामक व तांत्रिक सुधारणा केल्याने सर्वच कृषी उत्पादनात वाढ झाली. |