मराठी साहित्यात अत्यंत महत्वाचा साहित्य प्रकार म्हणून कादंबरी साहित्य प्रकाराकडे पहिले जाते. कथा कविता,नाटक या साहित्य प्रकारा प्रमाणे कादंबरी ही एक महत्वाचा साहित्यप्रकार आहे. मराठी साहित्याच्या इतिहासा मध्ये मराठी कादंबरीला जवळपास दीडशे वर्षाचा इतिहास लाभलेला दिसतो. स्वातंत्र्यपूर्व काळात कादंबरीचा साहित्य प्रकाराचे स्वरुप हे समाजिक घटकांवर अधिक अवलंबून होते. |