मध्ययुगीन कालखंडात प्रामुख्याने संत , पंडित व शाहिरी परंपरा महत्त्वाच्या आहेत . साधारणतः अकराव्या शतकापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंतच्या कालखंडाला मध्ययुगीन कालखंड म्हणतात . संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत एकनाथ , संत नामदेव , संत जनाबाई , संत चोखामेळा हे सर्व संत समाजाच्या विविध स्तरातील होते . या सर्व संतानी आपल्या साहित्यातून समाजातील जातीयता , विषमता , अंधश्रद्धा , अनिष्ठ रूढी परंपरा यावर घणाघाती प्रहार करत समाजाला लोकशिक्षण दिले . |