भांडवली खात्यावरील रूपयाच्या परिवर्तनीयतेच्या प्रक्रीयेचा सर्वांगीण विचार केल्यास दिसून येते की,भारतासाठी रूपयाची परिवर्तनीयता ही आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब नाही. परंतु जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेत ते नक्कीच एक आवश्यक पाऊल आहे.परंतु कोणत्याही पूर्वतयारीशिवाय ही परिवर्तनीयता करणे भारतासाठी गंभीर धोकेदायक ठरु शकते. श्री.एस.एस.तारापोर समितीच्या प्रमुख तीन अटींचा विचार केल्यास भारताजवळ आज परकीय चलनाची पुरेशी गंगाजळी उपलब्ध आहे. |