भाषा ही मानवी जीवनव्यवहाराची मुख्य वाहक आहे. भाषामुळे मनातील विचार व्यक्त करता येतात, भाषेच्या आधारेच मानवी जीवनाच्या सर्व अंगोपागांना अर्थपूर्णता येते. म्हणून समाजात वेगवेगळ्या व्यक्ती व व्यक्ती समूह सतत आपापल्या संस्कृतीचे आविष्कार घडवित असतात ते आपल्याला भाषा माध्यमातून , म्हणजेच भाषा हा व्यक्ती व्यक्ती मधला आणि व्यक्ती व समाज यांच्यातील दुवा आहे. |