वारकरी संप्रदायाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांना ‘संतशिरोमणी’ मानले जाते. अवघ्या २२ वर्षीय आयुष्यात ‘ज्ञानेश्वरी’ , ‘अमृतानुभव’ , ‘चांगदेव पासष्टी’ , ‘अभंगमाला’, आणि ‘हरिपाठ’ या अवीट गोडीच्या भक्तीरसपूर्ण वाड्मय निर्मितीने आणि अलैकिक कार्याने प्रसिद्ध पावले. ७०० वर्षापूर्वी ‘संस्कृत’ ही ज्ञानभाषा असताना जनसामान्यांसाठी ‘प्राकृता’ तून साहित्य निर्माण करणारे ते एक दृष्टे क्रांतिकारी म्हणून संबोधले जातात. संतज्ञानदेवांनी हरिपाठ सांगण्यापूर्वी चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, श्रुती, स्मृती, उपनिषदे, महाभारत, रामायण अशा अनेकानेक ग्रंथाचे परिशीलन केल्याचे अभंगाअभंगातून प्रत्ययास येते. |