प्रत्येक माणूस जन्माला येतो तो एक जमीन घेवून आणि ही जमीनच त्याच्या जीवनाचा आधार असते . अशा प्रकारचा आधार घेवून जन्माला आलेल्या माणसाला वरचे आकाश हेच त्याचे छत्र असते . तेच सत्यही असते . कारण त्या माणसाला गाव , नाव, आई- वडील , नातेवाईक अथवा जात , धर्म , कुल , गोत्र अशासारख्या कोणत्याच अस्तित्त्वाच्या खुणा नसतात. तेव्हा हा माणूस आपल्या अस्तित्त्वाच्या शोध घेण्याचा प्रयत्न करतो. |