दलित कवितेच्या पहिल्या जोमदार लाटेनंतर , दलित कवितेत काहीसा एकसुरीपणा , साचेबंधपणा आलेला असला तरी या साचेबंधपणाला , छेद देणारी कविता नंतरच्या काळात लिहली गेली . तिने आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे . त्यामध्ये भुजंग मेश्राम , वाहरू सोनवणे , विनायक तुमराम , माधव सरकुंडे, राम , अरुण काळे , लहू कानडे , महेद्र भवरे , मधु गवई , शिवाजी सोनवणे , लोकनाथ यशवंत , बबन लोंढे , भाऊ पंचभाई , केतन पिंपळापुरे , सुरेंद्र नाईक , जगदिश कदम , जावेद कुरेशी , सागर जाधव इ . कवींनी दलित कवितेच्या नव्या रुपाची जाणीव साहित्य जगाला करून दिली आहे. |