स्त्री ही रेग्यांच्या काव्याची प्रेरक शक्ती , स्त्री रुपांमधूनच विश्वातील चैतन्य विलसताना दिसते . स्त्रीच्या अनेक प्रकारच्या रूपांचे गोदण त्यांची प्रतिभा गोंदवते ते गोदण कधी बालिकेच्या रुपात , कधी पूर्ण स्त्री कधी शहनाज, कधी पांचाली , कधी नर्तिका; तर कधी रात्रीच्या रुपात अंतरमनाला नुसतेच जाणवते . इतके होऊनही तिचे अप्रूप संपत नाही म्हणून रेषांच्या रुपात तिला पल्लवित केले जाते. |