लोकसाहित्याच्या संकलन-अभ्यासाची सुरुवात नेमकी कधी झाली? लोकसाहित्याच्या संकलनाची प्रेरणा कशी मिळाली? याविषयी नेमके सांगणे अवघड असले , तरी ही प्रेरणा मुळचीच असावी असे मला वाटते. मी एम.ए.ला असताना उत्सुकता म्हणून काही अहिराणी म्हणी व लोकगीते संकलित केली होती. पण दोन-चार वर्षे त्या वहीकडे मी फारसे गांभीर्याने पहिले नाही. |