19 व्या शतकात खानदेशात जनजागृतीसाठी काही वृत्तपत्रे निघू लागली. ही वृत्तपत्रे मातृ भाषेतून असल्यामुळे त्यामधून राष्ट्रवादी विचार, भावना व्यक्त होत होते. तथापि स्थानिक वृत्तपत्रांवर इंग्रजांनी कडक निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला. काही उदारमतवादी गव्हर्नर जनरलांनी वृत्तपत्रांवरील बंधने शिथिल करून त्यांचे विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य दिले. परिणामी वृत्तपत्रातून सरकारवर टिका केली जावू लागली. |