महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये नाटकांना महत्वाचे स्थान आहे. मराठी माणूस हा नाट्यवेडा आहे.म्हणूनच गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली मराठी रंगभूमी समृध्द आहे. नाटक हे दृश्य आणि श्राव्य व वाचनिय माध्यम आहे.मराठी नाटकांची सुरुवात इ.स.१८४३ साली विष्णूदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या प्रयोगाने झाली असे सांगितले जाते. |