मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या मुलभूत गरजांची पूर्तता ही भूमीतुन मिळणाऱ्या अन्न, वस्त्र व निवारयाकारिता आवश्यक असणाऱ्या बाबी याद्वारे होत असते. माती ही एक महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती मानली गेली आहे. पिकांना पाणी, वनस्पतींना पोषणद्रव्ये, खनिजे आणि रासायनिक खते जमीनीकडुनच मिळत असतात. |