"भ्रष्टाचारास आळा घालणे हे केवळ तात्विक पातळीवरच नव्हे तर व्यवहारिक पातळीवर आवश्यक आणि अपरिहार्य आहे." प्रशासनातील भ्रष्टाचार ही आधुनिक युगाची समस्या नाही, तर ऐतिहासिक काळातील ही समस्या होती असे दिसून येते. कौटिल्य याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात भ्रष्टाचार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर चर्चाझालेली दिसून येते. |