भारतातील आदिवासींच्या सर्वात मोठ्या गटांपैकी एक भिल्ल आदिवासी होते.शतकांपासून प्रगत समाजाशी संपर्क असलेली ही जमात असून रामायण-महाभारत काळातही त्यांचा उल्लेख आढळतो.त्यांचे मूळ ‘मुंडा’ या प्रमुख आदिवासी शाखेपासून रजपुतांशी त्यांचा बराच संबंध आलेला दिसून येतो.ही आदिवासी जमात ठाणे,कुलाबा, रत्नागिरी, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव तसेच बृहन्मुबई ,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर या भागात विखुरलेली आढळते. |