शिक्षणशास्त्र ही आंतरविद्याशाखीय शाखा आहे. विविध विषयातील संशोधनामुळे शिक्षणशास्त्र अधिकाधिक व्यापक बनत गेले आहे. तांत्रिक ज्ञानाचा वापर आज मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने शिक्षकाला जास्तीत जास्त कुशल बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षणाची गुणवत्ता शिक्षकावर अवलंबून असते. शिक्षकाची गुणवत्ता ही शिक्षकाला दिल्या जाणा-या प्रशिक्षणावर अवलंबून असते. |