सन 1857 उठावाची लाट संपूर्ण भारतभर पसरलेली होती. त्यावेळी जव्हार पासून 8 मैलावर नांदगाव या खेडयात धाकटया पातीचे देवबाराव यांच्याकडे जव्हार संस्थानच्या सैन्याचा ताबा होता. संस्थानाच्या हद्दीतील लोक ब्रिटिशांना फितुर होऊ नयेत म्हणून त्यांनी सर्व काळजी घेतली होती. आपल्या जवळील अल्प सैन्यासह 1857 च्या उठावामध्ये सहभागी होऊन त्यांनी ब्रिटिषांबरोबर सामना दिला. ''अखेर ब्रिटिषांनी त्यांना पकडून दीर्घ मुदतीची षिक्षा दिली. नंतर त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये डांबून ठेवण्यात आले. त्यातच त्यांचा मृतयू झाला. ही स्वातंत्र्य चळवळीतील जव्हारच्या सहभागाची सुरूवात होती. |