आधुनिक महाराष्ट्रला मंत्रमुग्ध करणाऱ्यामध्ये राम गणेश गडकरी हे नाव निश्चितच अग्रस्थानी आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही. अनेक मोठमोठ्या साहित्यिकांनी त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी त्यांना आपल्या गुरूस्थानी मानले. ऐन तारूण्यात कालवश झालेल्या राम गणेश गडकरी यांनी साहित्यातून आपली स्वत:ची अशी आगळी वेगळी ओळख निर्माण केली, स्वत:चे युग निर्माण केले. महाराष्ट्रनो गडकऱ्यावर भरभरून प्रेम केले, त्यांच्या साहित्यकृतींना अक्षरश: डोक्यावर घेतले. गडकरी इतके होते की, काव्य, नाटय, आणि विनोदी या परस्पर विरोधी तीनही क्षेत्रात ते सारख्याच वैभवाने व सारख्याच दिमाखाने तळपत राहिले. त्यापैकी गडकऱयांनी कोणताही एकच साहित्यप्रकार हाताळला असता तरी त्यांना निश्चितच इतकी प्रसिद्धी मिळली असती हे ही तितकेच खरे. मात्र या तीनही क्षेत्रात त्यांनी एकाचवेळी असामान्य प्रभुत्व मिळविले आणि अलौकिक यशाची श्रीमंती त्यांना लाभली. हे एवढे भव्य दिव्य यश त्यांनी केवळ आपल्या 34 वर्षाच्या आयुष्यात प्रप्त केले |