मानवअधिकार ही संकल्पना मानवास प्राप्त झालेल्या अधिकाराशी संबंधीत आहे हा असा अधिकार आहे जो मनु’यास जन्मत: प्राप्त होतो. मानवाधिकार व्यक्तीचा तो नैसर्गिक अधिकार आहे जो राज्य, शासक, संसद, रूढी-परंपरा आणि कायदे यांची देणगी नाही. त्याची निर्मिती व्यक्तीच्या जन्मापासून झालेली आहे. राज्य, समाज हया संस्था नंतर निर्माण झाल्या आहेत. फार तर आपणास असे म्हणता येईल की, वेळाेवेळी राज्य आणि कायद्यांनी त्यात परिवर्तन घडवून आणले आहे. समाज आणि राज्यसंस्थे तर्फे मानवाधिकारात घडवून आणलेले परिवर्तन हे मानवाधिकाराचे उल्लंघन होवू नये या उद्देशानेच. मानवाधिकाराचा मुख्य उद्देश हाच आहे की, 'प्रत्येकास लोकतांत्रिक अधिकारांचा उपयोग करून स्वत:च्या व्यक्तीमत्वाचा विकास करता यावा'. व्यक्तीस प्राप्त अधिकारात जीवीत, स्वातंत्र्य व सुखी जीवन जगण्याचा अधिकार समाविष्ट आहे. मानवाधिकार ही संकल्पना व्यापक आहे ती व्यक्तीच्या सामाजिक जिवनाची दिशा आहे जी मानवास सामाजिक आणि कायदेशीर कार्य करण्यास सम्मती देते. |