भारातीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये मौलिक अधिकारांचा समावेश केला आहे. याबाबत संविधानकार अमेरिकेच्या संविधानाने प्रभावित होते. संविधानाच्या प्रकरण 3 ला ‘भाराताचा मैग्राकार्टा’ म्हटले आहे, जे की योग्य आहे यामध्ये एक लांब तसेच विस्तृत सूचीमध्ये न्यायोचित मूलभूत अधिकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविकता ही आहे की, मौलीक अधिकार जेवढे विस्तृत भारातीय संविधानात आहे, तेवढे जगाच्या कोणत्याही संविधानात दिसून येत नाही. संविधानाद्वारा कोणत्याही भेदभाविना प्रत्येक व्यक्तिला मोलीक अधिकारांची हमी दिली आहे. |