लोकसंख्येच्या बाबतीत आजही भारताचा जगात दूसरा क्रमांक लागतो. देशाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच अन्नधान्याची गरजही वाढत आहे. भारतात हरीतक्रांतीपासून अन्नधान्याच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हरीतक्रांतीपूर्वी देशातील अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी देशात उत्पादित होणारे अन्नधान्य अनुरे पडत होते. त्यामुळे देशाची अन्नधान्याची गरज भागविण्यसाठी विदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत होती. मात्र 1966-67 नंतर म्हणजेच हरीतक्रांती पासून देशात भरपूर उत्पादन देणाज्या वाणांचा उत्पादनासाठी वापर करण्यात येऊ लागला. त्यासोबतच किड नियंत्रनासाठी किटकनाशकांच्या वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जास्तीचे उत्पादन मिळावे यासाठी रासायनिक खते, द्रव्ये यांच्याही वापरात वाढ झाली. परिणामी आपल्या देशात अन्नधन्य उत्पादनात अमुलाग्र वाढ झाली. या वाढीमुळे आपली अन्नधान्याची गरज पूर्ण झाली. |