1920 नंंतरचा मराठी नाट्याड्यामयाचा इतिहास अनेक दृष्टीने वैशिष्टयपूर्ण राहिला आहे. 1916 ते 1930 हा मराठी रंगभूमीचा सर्वांगीण उत्कर्षाचा काळ मानला जातो. त्यानंतरचे दशक मराठी रंगभूमीला वाईट राहिले. मामा वरेरकर, प्र.के. अत्रे, मो.ग. रांगणेकर यांची या काळताील कामगिरी महत्वपूर्ण राहिली. मामा वरेरकर यांनी जवळपास पन्नास नाटके लिहिली. 1933 साली नाट्यमन्वंतर संस्थेने 'आंधळ्याची शाळा' या नाटकाचा केलेला नाट्यप्रयोग अनेक दृष्टीने महत्वपूर्ण ठरला. 1930-40 या काळमाध्ये प्र. के. अत्रे यांनी घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, मोरूची मावशी, लग्नाची बेडी यासारखी विनोदी, तर काहीशी उपहासप्रचुर, समस्याप्रधान नाटके लिहिली. 1943 मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा शतकमहोत्सव साजरा झाला. यामुळे मराठी रंगभूमीमध्ये चैतन्य निर्माण झाले. |