भारतीय इतिहासाच्या विविध कालखंडात स्त्रियांच्या दर्जात सातत्याने परिवर्तन होत गेेले आहे. वैदिक कालखंडात स्त्रियांचा दर्जा बऱ्याच प्रमाणात समाधानकारक होता. वेदोत्तर कालखंडानंतर ते मध्ययुगीन काळपार्यत स्त्रियांच्या दर्जात घसरण होत गेली. आधुनिक भारताच्या इतिहासात बिटीश काळता स्त्रियांच्या दर्जात सुधारणा होण्यास प्रारंभ झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळता तर भारतीय स्त्रियांच्या दर्जात अधिक वेगाने परिवर्तन होत असल्याचे निदर्शनास येते. सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्यादि जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढत आहे. ज्या क्षेत्रात स्त्रियांनी प्रवेश केलेला नाही असे क्वचितच एखादे क्षेत्र असेल. आधुनिक भारतात भारतीय स्त्रियांच्या दर्जात जे परिवर्तन झाले,घडून येत आहे, ते आपोआप झालेले नाही. |