पुण्याहून जुन्या महामार्गाने मुंबईकडे जात असता लोणावळ्याच्या अलिकडे कार्ला फाटा लागतो. या फाटयावर उजव्याबाजूने गरावरील अवघड चढणीचा रस्ता पार करून पार्कींगजवळ गाडी लावून वर पाय-यांचा रस्ता चढूनच जावे लागते. पश्चिममुखी भव्य कार्ले लेणी समुह आहे. कार्ला हे शैलगृह प्राचीन काळातील सुप्रसिद्ध असे बौद्ध केंद्रापैकी एक मानले जाते. कार्ला गुंफा इंद्रायणी नदीच्या उत्तरा दिशेस असलेल्या डोंगरावर 100 मी. उंचीवर कोरण्यात आल्या आहेत. भाजे लेणी समूह दक्षिणेस तर कार्ला लेण्या उत्तरोस असून दोघा स्थळांमध्ये 7 ते 8 कि. मी. अंतर आहे. |