प्रारंभी सागरावर युरोपीयन व्यापा-यांचे आरमारी वर्चस्व होते. भारतातील कोणत्याही ऐतद्देशीयांची सागरावर सत्ता चालत नसे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र कोकणचा प्रदेश जिंकल्यावर स्वराज्याच्या सीमा सागरापर्यंत जाऊन भिडल्यात. सागरावर स्वामित्व असलेल्या पाश्चात्यांचा स्वराज्याला धोका निर्माण झाला. त्यांना प्रत्युत्तरा देवून स्वराज्याचे रक्षण करण्याकरिता महाराजांनी आरमार उभारून पश्चिम किना-यावर जलदुर्ग बांधून काढलेत. |