शिवपूर्वकालात महाराष्ट्रीय समाज वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. सातवाहन, राष्ट्रकूट ह्या राजसत्ता वैदिक धर्माचा अभिमान बाळगून होत्या. स्वाभाविकच तत्कालीन समाजव्यवस्थेवर यज्ञसंस्थेचा मोठा प्रभाव होता. शक, यवनांसारख्या राजवटींनीसुद्धा हिंदूधर्माचा स्वीकार केला होता. मात्र जैन आणि बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे यज्ञसंस्थेवर थोडा परिणाम झाला. |