ज्या गोष्टीवरून इतिहासाचा अभ्यास करतांना भूतकालीन मानवी जिवनाविषयी महत्वपूर्ण अशी माहिती मिळते किंवा इतिहास ज्या साधनांच्या आधारे लिहीला जातो त्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांमध्ये ताम्रपट, शिलालेख, कलाकृती, कागदपत्रे, आत्मचरीत्रे, प्रवासवर्णने, वस्तू वा वास्तू अशा अनेक बाबींचा समावेश होतो. ऐतिहासिक साधनांचे भौतिक आणि वाडमयीन असे दोन प्रकार पडतात. भौतिक साधनांनाच अलिखीत किंवा पुरातत्वीय साधने असे म्हणतात. |