आज जगातील सर्वच देशामध्ये महिलांच्या समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातल्या त्यात मागास आणि विकसनशील देशांमधील महिलांच्या समस्या अधिक गंभीर आहेत. त्यांच्या या समस्यांना एकमेव प्रमुख कारण हे आर्थिक परिस्थिती आहे. त्यामुळे महिला जर आर्थिक दृष्टीने सक्षम झाल्यात तर सर्वच समस्यांचा निचरा होईल. याकरिताच सर्वच देशांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाकरिता अशासाकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. आणि दारिद्रय निमूर्लन हे महत्वाचे उद्दीष्टे समोर ठेवले गेले. या दृष्टिकोनातून व्यापक विचार झाला असता महिलांच्या सक्षमीकरणाकरिता दारिद्रय निर्मूलनाच्या वाटचालीचे दिव्य पार पाडण्याकरिता महिला बचत गटांची भूमिका ही महत्वपूर्ण असल्याचे दिसते. म्हणूनच सर्वत्र बचत गटांच्या प्रक्रियेला गती आली. |