ग्राहक म्हणजे सर्व वस्तू व सेवा ग्रहण करणारा,उपभोगणारा व तो जगाच्या पाठीवरील कोणत्याही खेडयातला, शहरातला अथवा देशातील असू दे. ग्राहकांचे हे कार्य सर्वमान्य आहे. ग्राहकाला जीवन जगताना वस्तू सेवा यांची गरज भासते. यासाठी ग्राहक मागणी करतो. उत्पादक ती मागणी पूर्ण करतो. एवढा सरळ सोपा व्यवहार-मानवीवृत्तीमुळे हा सोपा व्यवहार गुंतागुंतीचा झाला. उत्पादक आपल्या नफ्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्यांचा वापर करून ग्राहकंना भुलवत राहिला. त्याला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवले जावू लागले. बाजारपेठेचा राजा असणाऱ्या किनाऱ्याची, यामधूनच जन्म झाला ग्राहक चळवळीचा. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या ग्राहक समाजाचा प्रारंभ झाला नवयुगाचा,ग्राहकयुगाचा. ग्राहक ज्यावेळी स्वत:ची मदत,संरक्षण करायला सिध्द झाला त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था ग्राहक हितासाठी झटू लागल्या. |