भाषेचा मानवी जीवनाशी अगदी जवळचा संबंध असून भाषा संपादनाचे सामर्थ त्याला उपजतच प्राप्त झालेले असते. त्याच्यामध्ये असलेली 'भाषिक क्षमता' निर्सगानेच त्याला दिलेली आहे. या भाषेच्या माध्यमाने माणसाला त्याच्या वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक तसेच बौद्धिक व इतर सर्व व्यवहार पार पाडता येतात. मानवी जीवनातील संस्कृतिची जडणघडण, तिची जोपासना, सामाजिक व्यवहार, ज्ञानग्रहण व ज्ञानवृध्दी, इतिहास, मानव्य शास्त्रांची निर्मिती, कला व्यापार असे सर्व व्यवहार भाषेचे सुलभ केले आहेत. आणि या भाषेचे ज्ञान विद्याथ्र्याना महाविद्यालयीन स्तरावर पोहचेपर्यत प्राप्त झालेले असते. अश्या -स्थितीत केवळ अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा हे साधन वापरणार आहोत कां ? की ज्या भाषेने मानवी जीवनाचे सर्वागाने दशर्न घडविण्याचे, मानसाच्या अंतर्मनात दडपल्या गेलेल्या अनेक भावभावनांना उजागर करण्याचे काम कलात्मक रितीने करून ठेवले आहे त्याचा मानवी जीवनाशी असलेल्या संबंधाने, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने असलेल्या मुल्यांचे कांही बिजारोपण करता येईल कां हा विचार मूळता मराठी भाषा अध्यापनाच्या दृष्टीने अधिक महत्वाचा आहे असे वाटते. |