1990 नंतरच्या ग्रामिण वितेते जी काही थोडीफार महत्त्वाची कवीमंडळी लिहू लागली, त्यात कैलास दौंड यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. कैलास दौंड ज्या शेतकरी कुटूंबात वाढले, त्या कुटूंबाची सुखदु:खे त्यांनी जवळून पाहिली, तशीच त्या परिसरातील कष्टकरी कामगारांच्या सुखदु:खाचेही जवळून दर्शन घेतले. त्याचे शेतकरी मायबाप हे भूकभाकरी भोवती फिरत होते. ते कोरडवाहू शेतकरी असल्यामुळे त्यांच्या वाट¶ाला हालअपेष्टा आल्या होत्या. त्यांनी फरकट आणि हेळसांड सोसून, पचवून कैलास दौंड यांचा पिंड घडत होता. त्यामुळेच त्यांच्या कवितेत शेतकज्यांचे तसेच शेतमजूरी करणाज्यांचे कर्ज, कष्ट , उपासमार, अज्ञान, शोषण यांचे दुष्टचक्र प्रत्ययास आल्याशिवाय राहत नाही. या पाश्र्वभूमीवर कैलास दोैंड यांच्या पहिल्या तीन काव्यसंग्रहाचा शोधनिबंधात्मक आढावा घ्यायचा आहे. |