प्रस्तुत शोधनिबंधाचा विषय भासांचे बालचरितअसून त्याद्वारा वैष्णव पडसाद कसे दिसतात त्याचे अध्ययन करण्याचा प्रयत्न केला आहे. कालिदासाच्या साहित्याकडे बघितले असता शैवधर्मातील पाशुपत संप्रदायाचे उल्लेख आढळतात जसे : वागर्थविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्त्ये| जगतं पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ |