Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | 'अलिप्त चळवळ - सातत्य, बदल आणि भवितव्य | Author Name : | | एम. टी. घंटेवाड | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6147 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | दुसऱ्या महायुध्दानंतर शितायुध्दाच्या वातावरणात आंतरराष्ट्रीय आणि जागतिक व्यवस्थेमध्ये अनेक नवीन घटनांचा उदय होत होता. अशा स्थितीत युरोपिय राष्ट्रांच्या वसाहतवादी, व्यापारी, साम्राज्यवादी विचारप्रणालीचे प्राबल्य कमी होऊन भांडवलशाही अमेरिका आणि साम्यवादी सोव्हियत रशिया या दोन महासत्ताधारी गटाचे वर्चस्व वाढू लागले. भांडवलशाही अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली पश्चिम युरोपात भांडवलशाही गटाचा उदय तर पूर्व युरोप खंडात साम्यवादी सोव्हियत रशियाच्या नेतृत्त्वाखाली साम्यवादी राष्ट्रांच्या गटाचा उदय झाला. याच कालखंडात आफ़्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका खंडातील युरोपियन राष्ट्रांनी निर्माण केलेले साम्राज्य नष्ट होण्यास प्रारंभ झाला. त्यातूनच नवस्वतंत्र राष्ट्रांचा उदय होत होता. 1947 साली बिटिश साम्राज्याच्या नियंत्रणातून मुक्त झालेल्या भारतामुळे निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेस अधिकच गती मिळली. | Keywords : | | |
|
|