भारत हे संघराज्य आहे. येथील सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीचा विचार केल्यास खूप मोठी प्रादेशिक विषमतेची दरी दिसून येते. नौसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेतील तफावत तसेच पायाभूत सुविधांचा अभाव, औद्योगिकीरणाचा अभाव, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासारख्या घटकांचा अभाव या मानव निर्मित कारणांमुळे प्रादेशिक विषमतेत वाढ होते. भारतीय संघराज्य निर्मितीचा विकास इंग्रज शासन काळातच झाला होता. ब्रिटिश सत्तेविरूद्धच्या दीर्घकाळच्या आंदोलनानंतर 15 ऑगस्ट 1947 ला फाळणीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. साहजिकच स्वदेशी राज्यकत्र्यांकडून इच्छा, आकांक्षा, आशा, अपेक्षा आणि त्याची पूर्तता याबद्दलची जनतेची अपेक्षा पूर्ण करणे या विविधतेने नटलेल्या देशात एक मोठे आव्हान होते. त्यातून व राज्य कारभाराच्या सोयीसाठी पहिले महत्त्वाचे पाऊल पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना उचलावे लागले ते राज्यपूनर्रचनेचे विविध बाजूंनी अभ्यास व विचार करून निर्णयांती भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. |