प्रस्तुत संशोधनात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक प्रशिक्षणार्थ्याच्या अध्यापन कौशल्याचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यासाठी 883 प्रशिक्षणार्थ्याची सरल यादृच्छिक पध्दतीने नमुना निवड करण्यात आली. बी.के. पासी आणि एम.एस.ललिता यांच्या प्रमाणित सामान्य अध्यापन क्षमता चाचणीचा वापर करून माहिती संकलित करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संपूर्ण गटातील शिक्षक प्रशिक्षणार्थ्याच्या अध्यापन कौशल्य गुणांचा वक्र हा धन विषमित असून तो चर्पटक शिखरी आढळून आला. विविध गटांमध्ये अध्यापन कौशल्याच्या बाबतीत तुलना करण्यासाठी टी मूल्य काढण्यात आले. त्यावरून महाविद्यालयाच्या प्रकारानुसार अध्यापन कौशल्यात सार्थक फरक आढळून आला. परंतु लिंग, संवर्ग व शाखा यानुसार अध्यापन कौशल्यात सार्थक फरक आढळून आला नाही. |