फकीरशा महिबूब शहाजिंदे यांनी निधर्मी (1980) आणि आदम (1991) या दोन काव्यसंग्रहांबरोबर शेतकरी (1985) नावाचे दीर्घकाव्यही लिहिले आहे. 'शेतकरी' हे एक खंडकाव्य असून आजच्या एका शेतकज्याने अत्यंत निर्मळ मनाने केलेले ते प्रांजळ आत्मकथन आहे. या खंडकाव्याचा निवेदक आणि नायक हा कष्टाळू, श्रद्धाळू, परंपरावादी विचार मानणारा हाडाचा शेतकरी आहे. कवीने ग्रामीण भागातील समाजरचना, तेथील शेतकरी, त्यांचे जीवन, त्यांच्या समस्या, त्यांचे परस्पर संबंध आणि त्यांचे एकूणच जगण्या-मरणाचे प्रश्न अभ्यासले आणि या खंडकाव्यातून हाताळले आहे. 'ग्रामीण', 'खेडी', 'शेती' वगौरे शब्दांच्या आधारावर राजकीय जीवन जगणाज्या 'पुढाज्यांची' या शेतकज्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यांत डोकावून पाहावयाची, राबलेल्या चेहज्यावर नजर फेकायची, घट्टे पडलेल्या हातात हात घालायची हिम्मत चाळीस वर्षात झाली नाही. ती प्रा.फ.म.शहाजिंदे यांनी 'शेतकरी' काव्यसंग्रहात व्यक्त केली आहे. |