कुस्ती हा मराठी शब्द कुशती या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्यांचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहययुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंदव् खेळताना कमरेला जो पटटा किंवा जी दोरी बांधत त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंदव खेळले जाईल त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले. प्रतिस्पर्धावर शक्तीने व युक्तीने मात करून त्याला नामोहरम करणे हा कुस्ती हया शब्दाचा अर्थ आहे. |