स्त्रीमुक्ती स्त्री-पुरूष समता हे विषय भारतीय समाज व्यवस्थेच्या संस्कृतीच्या सुरूवातीपासून ऐरणीवरचे विषय महावीर बुध्द बसवण्णा चक्रधर चारवाक इत्यादी अशा कितीतरी महामानवांनी या विषयावर मांडणी केली. काम केले. प्राचीन भारतीय भौतिक संघर्षाचा सारा इतिहास जसा मानव मुक्तीचा इतिहास आहे तसाच तो स्त्री पुरूष समतेच्या मांडणीचाही इतिहास आहे. म.फुले, छ.शाहू, डॉ. आंबेडकर यांनी आधुनिक काळता उभी केलेली समता शोषण मुक्ती आणि मानवतेची चळवळ ही आधुनिक स्त्री मुक्तीचे पायाभूत चळवळ आहे. पण ती केवळ स्त्री पुरूष समतेची चळवळ नसून समग्रक्रांतीकारी समाज परिवर्तनाची व्यापक चळवळ आहे. स्त्री मुक्ती स्त्री पुरूष समता हे त्या व्यापक मानव मुक्तीच्या चळवळीचे एक अंग आहे. |