Useful Links |
|
Article Details :: |
|
Article Name : | | महाराष्ट्रातील आंतर-प्रादेशिक औद्योगिक विषमता: एक परीक्षण | Author Name : | | सी.एन.चोबे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | GRT-6504 | Article URL : | | | Author Profile View PDF In browser | Abstract : | | महाराष्ट्र राज्य देशामध्ये औद्योगिक दृष्टीने सर्वात विकसित राज्य असुन देशातील एकूण निर्मितीपैकी 20.98 टक्के, एकूण भांडवल गुंतवणूक व निर्माणी रोजगारांपैकी प्रत्येकी 13.03 टक्के, एवढा हिस्सा महाराष्ट्राचा आहे. जरी महाराष्ट्र राज्य देशामध्ये औद्योगिक दृष्टीने क्रमांक 1 चे राज्य असले तरी आपणास असे दिसते की, राज्यातील सर्व जिल्हे आणि प्रशासकीय विभागांनुसार (प्रदेशानुसार) प्रचंड औद्योगिक विषमता आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाची फळे सर्व जिल्हे व विभागातील लोकांना चाखावयास मिळत नसल्याने, लोक हिताच्या दृष्टीने अशी विषमता व असमतोलपणा अयोग्य आहे. मुंबई, ठाणे व पुणे या ठिकाणी असलेली औद्योगिक गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकारलेल्या औद्योगिक धोरणानुसार वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा प्रयत्न व उपाययोजनांमधून सर्व जिल्हे व विभागांमध्ये असलेली औद्योगिक विषमता/ असमतोलपणा कमी होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे.
वर्तमान टीयासामध्ये औद्योगिक धोरणांनुसार राज्यातील विविध प्रशासकीय सहा विभागातील औद्योगिक विषमता टीयास काळामध्ये कमी झालेली आहे किंवा नाही तिचा कल कसा आहे याचे परीक्षण करण्याचा एक प्रयत्न आहे.
| Keywords : | | - आंतर-प्रादेशिक औद्योगिक,औद्योगिक धोरण,औद्योगिक विकास,
|
|
|