आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासांत राजकीय सामाजिकरणाला महत्वाचे स्थान आहे. कारण सामाजिकरणाची प्रक्रीया सक्षमपणे पूर्ण झाल्याशिवाय शासन व्यवस्थेची सामाजिक, अर्थिक, राजकीय, धार्मिक विकास व प्रबोधनाची प्रक्रीया त्याचबरोबर त्याच्याशी संबधित ‘निर्णयप्रक्रीयेची’ प्रक्रीया पूर्ण होणे अशक्य आहे. म्हणून सामाजिकरणाची मुलभूत पायाभरणी करायची असेल तर व्यक्ती, पुढारी, समाज आणि शासन यांनी राजकीय सामाजिकरणाच्या माध्यमातुन एकसूत्रात बांधले जाणे काळाची गरज आहे. |