भारताचे माजी उपपंतप्रधान, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्व.यशवंतराव चव्हाण ही केवळ एक व्यक्ती नसुन तो एक विचार होता....जसा तो एक विचार होता तसा तो एक आचार होता....एक कर्तव्यदक्ष प्रशासक,चतुर आणि मुत्सद्दी राजकारणी,साहित्यप्रेमी,थोर ज्ञानपिपासु,एक रसिक नेता आणि एक कनवाळू माणुस अशा कितीतरी पैलुंनी यशवंतरावांचे दर्शन महाराष्ट्राला आणि देशाला घडले आहे.एक साहित्यप्रेमी या अर्थाने विचार करता ते म्हणतात की,शब्दांच्या सामर्थ्यावर आणि सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे.शब्द विचार देतात.बंदुकीच्या गोळीतुन जे प्राप्त होत नाही ते शब्दातून येते.साम्राज्यशाही धुळीला मिळविण्याचे संहारक सामर्थ्य शब्दात आहे.तसेच कल्पना,विचार आणि शब्द ...यांचा त्रिवेणी संगम ही मानवी इतिहासातील जबरदस्त शक्ती आहे.साहित्याचे प्रमुख शब्दच आहे आणि राजकारणाचे प्रमुख माध्यम शब्दच आहे."म्हणुन शब्दास विशेष महत्त्व ते देतात. |