‘चरित्र’ हा तसा प्राचीन वाङ्मय प्रकार. शके 1200 (इ.स. 1278) च्या सुमारास म्हाइंटभटाने लिहिलेला ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ मराठी भाषेतील आद्य चरित्रग्रंथ होय. नंतरच्या काळात मराठी भाषेत संत, महंत, राष्टपुरुश, समाजसुधारक, नेते, अभिनेते अशा समाजातील विविध मान्यवर व्यक्तिची चरित्रे लिहिली गेली. चरित्र लेखनासाठी असामान्य व्यक्तीची नायक म्हणून लेखकाने निवड केलेली असते. त्या चरित्र नायकाच्या कार्यकत्तृत्वाची ओळख करुन द्यावी, त्यातून समाजाला मार्गदर्शक लाभावे. त्या चरित्र नायकाचे विचार समाजातील तळागाळातल्या लोकापर्यंत पोहचवावे आणि त्याने केलेल्या कार्याचा गौरव करावा अशा काहीशा हेतूने लेखक चरित्र लेखन करीत असता. |