भारत राजकारणाची एक (अ)समृध्द अडगळ हे षिर्शक काहिसे भालचंद्र नेमाडयांच्या हिंदू कांदबरीच्या षिर्शकाषी साधम्र्य साधतांना दिसत असले तरीही अर्थाअर्थी त्यांचा काहिही संबंध नाही. कारण त्यांची समृध्द अडगळ हि हिंदू धर्माषी व त्यातील विविधता असलेल्या संस्कृतीषी संबंधित आहे. तर माझ्या या षिर्शकातील (अ)समृध्द अडगळ हि भारतीय राजकारणाषी संबंधित आहे.व ती संपुर्ण भारतासंदर्भात आहे. कारण भारतात जितकी सामाजीक, सांस्कृतिक,भाशीक, धार्मिक, वांषिक विविधता आहे. तितक्याच मोठया प्रमाणात विविधता हि राजकारणातही निर्माण झालेली बघायला मिळते. कारण समाजषास्त्रीय दृश्टया विचार केला तर असे दिसून येईल कि प्रत्येक व्यक्ती हा एक स्वतंत्र राजकीय एकक असतो. व त्याचे व्यक्तीमत्वही इतरांपेक्षा थोडेषे तरी वेगळे असलेले बघायला मिळते. व त्याचप्रमाणे त्यांच्यावरती झालेले राजकीय संस्कारही भीन्नभीन्न स्वरुपाचे झालेले असतात. |