स्वातंत्र्योत्तर अर्धशतकानंतर खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणजेच ‘खाऊजा’ या धोरणाची चर्चा आपल्याकडे सुरू झाली आहे. 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकातच जागतिकीकरणाचे भयावह रूप दिसू लागते आहे. गौतम बुध्दापासून भारतीय संस्कृतीचे स्थित्यांतर व संक्रमण होत गेले सामान्य माणसाचे संवर्धन व संकरण या प्रक्रियेचा केंद्रबिंदू होता. |