प्र. के. अत्रे लिखित “तो मी नव्हेच” ह्या सामाजिक नाटकाचा पहिला प्रयोग ८ ऑक्टोबर १९६२ रोजी दिल्ली येथे सादर केला. अत्रे यांचे मराठी वाड्मयात एक वेगळे स्थान आहे. विनोदी लेखक विडंबनकर आणि प्रहसनकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. अत्रेंच्या इतर नाटकांप्रमाणेच “तो मी नव्हेच” या नाटकाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. त्यांचे पहिले नाटक “साष्टांग नमस्कार” हे रंगभूमीवर आले आणि मराठी नाट्यसृष्टीतील एका नव्या कालखंडाला प्रारंभ झाला. यानंतर त्यांनी ‘घराबाहेर’, ‘लग्नाची बेडी, उधाचा संसार’, कवडीचुंबक’, मोरची मावशी’ वगैरे नाटके लिहून मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटविला. |