कट्टर राष्ट्रनिष्ठ लढाऊ राष्ट्रवादाचे आग्रही पुरस्कर्ते, स्वातंत्र्य संग्रामातील जहाल राजकारणाचे आग्रणी, स्वातंत्र्याकरिता आझाद हिंद फौजेची निर्मिती करुन ब्रिटीश सत्तेविरुध्द सषस्त्र लढा देणारे आघाडीचे सेनापती, ‘चलो दिल्ली’ चा नारा देणारे अपूर्व साहस व त्याग यांचे प्रतीक असलेले, स्वातंत्र्य संग्रामातील वादळी व महान व्यक्तिमत्व म्हणजे सुभाषचंद्र बोस होय. यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे झाला. यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ तर आईचे नाव प्रभावती देवी असे होते. |