18 व्या शतकात समाजात धर्माचा प्रभाव मोठया प्रमाणावर असल्यामुळे धर्मभोळया समजुती, रूढी व परंपराही मोठया प्रमाणावर पाळल्या जात होत्या. स्त्रियांच्या सामाजिक, धार्मिक चालीरिती, रितीरिवाज, आचार विचार, कर्मकांड विधी इत्यादीबाबत प्राबल्य होते. हा सामाजिक रितीरिवाज कोणी मोडला तर त्यास गोतसत्ता शिक्षा देत असे. |